📌 आणि...1 वर्षानंतर राजूभाऊ गेले स्वगृही. 📌 सविस्तर : दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 11 च्या सुमारास कामठी येथील वृषभ आपले काम आटपवून घरी जात असताना त्याला गरुड चौक कामठी येथे थोडा घाबरलेला, चेहऱ्यावर व इतर ठिकाणी जखमा असलेला एक अनोळखी व्यक्ती दिसला. त्या व्यक्ती च्या अंगवार मळके, घाणेरडे कपडे होते. हातात कुणीतरी दिलेले खायचे अन्न होते. महत्वाचे म्हणजे तो फार घाबरलेला दिसत होता. त्याची एकंदर परिस्थिती बघत त्याच्या जवळ जावून वृषभनी चौकशी करण्याचा विचार केला. त्याची एकंदर मानसिक परिस्थिती बघता त्याला विश्वासात घेऊन 112 पोलीस कंट्रोल रूम मध्ये फोन केला. लगेच दोन पोलीस कर्मचारी आले व त्याला ग्रामीण रुग्णालय कामठी येथे प्राथमिक उपचाराकरिता दाखल केले. त्यानंतर वृषभ नी सदर इसमाची मला फोन द्वारे माहिती देऊन साथ फाऊंडेशन तर्फे मदतीची हाक मागितली. Whatsaap च्या मदतीनी सदर इसमाची माहिती जाणून घेतली, तेव्हा तो स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहू शकत नव्हता. सदर इसमास साथ फाऊंडेशन च्या माध्यमातून सहारा देण्यास मी वृषभ ला होकार दिला. कामठी पोलिसांच्या विनंतीपत्रावरून दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी सदर व्यक्तीला साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल केले. 68 दिवसांनी सदर व्यक्ती बोलू लागला. पहिल्या दिवसा पासून 68 व्या दिवसा पर्यंत राजु मुखबधिर, मानसिक प्रमाणे वागत होता. त्यानंतर राजू च्या परिवाराची साथ फाऊंडेशन तर्फे माहिती काढण्यास सुरुवात झाली. आणि आज 1 वर्षानंतर राजूभाऊला सुखरूप पत्नी व मुलाच्या स्वाधीन करण्यात आले.
हकीकत : वडकू दडमल हे चिमूर मध्ये 5-6 महिण्यान पासून भीक मागतांना परिसरातील नागरिकांना निदर्शनास आले. दिवसभर भीक मागायचं आणि सायंकाळी दुकानाच्या शेड खाली झोपायचं. अशी दिनचर्या सुरु असतांना सदर माहिती नागरिकांनी चिमूर पोलिसांना कळवळी. पोलिसांनी आजोबांच्या परिवाराची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सदर व्यक्ती मानसिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस स्टेशन चिमूर यांच्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत : मुलगा घरी ठेवायला तयार नसल्यामुळे बेघर झालेले गिरधारी बनकर यांना बुटीबोरी पोलीस स्टेशन च्या विनंती पत्रावरून आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.