हकीकत: कन्हान परिसरात बोलता, वाचता, ऐकता न येणारी महिला बेवारस स्थितीत आढळली असता. पोलीस स्टेशन कन्हान व हितज्योती फाऊंडेशन यांच्या विनंती पत्रावरून आश्रम मध्ये दाखल करण्यात आले. तसेच नाव माहिती नसल्याने सीताबाई असे नाव ठेवण्यात आले.
हकीकत: नागपूर शहरात दारोदारी भीक मागणे हा मूळ व्यवसाय असणाऱ्या छत्रपती होले यांना महानगर पालिका नागपूर तर्फे भीक प्रतिबंधक कायदान्वये उचलून आश्रय निवारा नागपूर येथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून महानगर पालिका नागपूर यांच्या विनंती वरून पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
हकीकत: कापसी पुलाजवळ फुटपाथ वर बेवारस स्थितीत मिळाल्याने पोलीस स्टेशन पारडी यांच्या विनंती पत्रावरून आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: पारडी नागपूर परिसरात बेघर अवस्थेत आढळलेल्या छबुबाई महादेव बोरकर ह्या निराधार व बेघर असल्याचे निष्पन्न झाले असता त्यांना पारडी पोलिसांच्या विनंती पत्रावरून साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
हकीकत: गोदाबाई कडून मिळालेल्या माहितीनुसार तिचा मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ती भाश्याच्या सहवासात राहत होती. भाश्यानी गोदाबाई चे पारडी येथील घर स्वतः विकून, शेती स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि त्यानंतर गोदाबाई ला अक्षरशः मारून घरा बाहेर काढले. त्यानंतर पारडी पोलीस स्टेशन च्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: बि.कॉम शिक्षण घेतलेल्या उषाताई कौटुंबिक आघाता मुळे मानसिक झाल्या. आणि त्या मानसिक अवस्थेत त्या विशाखापट्टनम पायदळ पोहचल्या. शासकीय संस्थे मार्फत उषाताईला श्रद्धा रिह्याबिलीटेशन फाऊंडेशन कर्जत, रायगड ला आणण्यात आले. तेथून उषाताईने कडून पत्ता मिळाल्यावर नागपूर ला आणल्यानंतर आई वडील मृत असल्याचे कळले. कुठेही व्यवस्था होणार नसल्याने आश्रम मध्ये दाखल करण्यात आले. आजच्या स्थितीत उषाताई पूर्णपणे बरी झालेली असुन छान प्रकारे जिवन जगत आहे. सोबतच आश्रम मधील आजी आजोबांना सांभाळत आहे.
हकीकत: निराधार असलेले रामसिंग ठाकूर यांना मुलबाळ नसल्याने मागील 10-15 वर्षांपासून शाळेसमोर गोळ्या बिस्कीट विकण्याचे काम करून स्वतःचा व पत्नीचा उदरनिर्वाह ते करायचे. उतरत्या वयात आता काम जमेनासे झाले. किरायाने राहत असल्याने घरभाडे देणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे पारडी पोलिसांच्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: नागपूर शहरात दारोदारी भीक मागणे हा मूळ व्यवसाय असणाऱ्या छत्रपती होले यांना महानगर पालिका नागपूर तर्फे भीक प्रतिबंधक कायदान्वये उचलून आश्रय निवारा नागपूर येथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून महानगर पालिका नागपूर यांच्या विनंती वरून पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
हकीकत: बेला परिसरात बेवारस स्थितीत मदिनाबाई काही नागरिकांना निदर्शनास आली. नागरिकांनी पोलिसांनी सदर महिलेची माहिती दिली. मदिनाबाई ची विचारपूस केल्या नंतर समजले कि ती ओडिसा येथील रहिवासी असुन थोडी मानसिक आहे. परिवाराचा शोध घेणे शक्य नसल्याने पोलीस स्टेशन बेला यांच्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: सदर महिला ही नवीन कामठी हद्दीतील ग्रीनसिटी परिसरात फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांन कडून तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. परंतू कोणीही नातेवाईक आढळून आले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन नवीन कामठी यांच्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: नागपूर शहरात दारोदारी भीक मागणे हा मूळ व्यवसाय असणाऱ्या छत्रपती होले यांना महानगर पालिका नागपूर तर्फे भीक प्रतिबंधक कायदान्वये उचलून आश्रय निवारा नागपूर येथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून महानगर पालिका नागपूर यांच्या विनंती वरून पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
हकीकत: आंध्रप्रदेश येथील रहिवासी सुबम्मा ही बुटीबोरी परिसरातील गोदावरी नगर मध्ये बेवारस अवस्थेत आढळून आली. तेलगू भाषेत बोलत असल्यामुळे तिची माहिती समजेनासे झाली. परंतू ती बेघर आहे हे निष्पन्न होताच पोलीस स्टेशन बुटीबोरी ला पत्रदेवून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: पोलीस स्टेशन कोंढाळी यांच्या माहितीनुसार शेवंताबाई मानसिक अवस्थेत 2 महिन्यापासून कोंढाळी जवळील बाजारगाव परिसरातील पेपरमिल जवळ राहत होती. घर, परिवारा बद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.
हकीकत: नागपूर शहरात दारोदारी भीक मागणे हा मूळ व्यवसाय असणाऱ्या छत्रपती होले यांना महानगर पालिका नागपूर तर्फे भीक प्रतिबंधक कायदान्वये उचलून आश्रय निवारा नागपूर येथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून महानगर पालिका नागपूर यांच्या विनंती वरून पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
हकीकत: नागपूर शहरात दारोदारी भीक मागणे हा मूळ व्यवसाय असणाऱ्या छत्रपती होले यांना महानगर पालिका नागपूर तर्फे भीक प्रतिबंधक कायदान्वये उचलून आश्रय निवारा नागपूर येथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून महानगर पालिका नागपूर यांच्या विनंती वरून पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
हकीकत: सखुबाई दाताळे वय 70 वर्ष 'हातावर आणणे पानावर खाणे' अशी तिची अवस्था. लग्न केले नाही त्यामुळे परिवारात कुणी नाही. स्वतःचे घर नाही. आजतोवर स्वाभिमानाणे जगण्यासाठी कुणाच्या कामाला जाणे आणि स्वतःचा उदरनिर्वाह करणे, असा तिचा नित्यक्रम..! शिरुळ येथील दुसऱ्यांच्या मोडक्या घरात ती जीवनाचा गाढा पुढे ढकलत होती. ही वेदनादायक माहिती आम्हा पर्यंत पोहचली असता,काल रात्री 10 च्या दरम्यान सखुबाई च्या अंधारमय जीवनात प्रकाशमय ज्योत फुलविण्यासाठी साथ फाऊंडेशन संचालित बेघर, निराधार लोकांचे पुनर्वसन करणाऱ्या पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे तिला दाखल करण्यात आले.
हकीकत: प्रभा कुंभारे यांना मुल नाही. पतीचे निधन झाले. हाताने काम होत असतांना लोकांची धुनी भांडी त्यांनी केली. मे 2022 ला पडल्याने त्यांच्या कंबरेला जबर मार लागला. ज्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता उतरत्या वयात काम पण जमेनासे झाले. अशा अवस्थेत बुटीबोरी पोलीस स्टेशन च्या विनंती पत्रावरून त्यांना आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: शकुंतला बाईच्या पतीला दोन बायका झाल्या. हिला मुलं झाले नाही. पतीचे निधन झाले. त्यामुळे बेघर, निराधार असलेल्या शकुंतला बाईला बुटीबोरी पोलीस स्टेशन च्या विनंती पत्रावरून आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: नागपूर शहरात दारोदारी भीक मागणे हा मूळ व्यवसाय असणाऱ्या छत्रपती होले यांना महानगर पालिका नागपूर तर्फे भीक प्रतिबंधक कायदान्वये उचलून आश्रय निवारा नागपूर येथे काही दिवस ठेवण्यात आले. तेथून महानगर पालिका नागपूर यांच्या विनंती वरून पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
हकीकत: मनाबाईचा मुलगा खूप दारू पितो. तिला त्रास देतो. त्यामुळे या सर्व कौटुंबिक कारणातून मनाबाई अंभोरा तीर्थक्षेत्र येथे आत्महत्या करण्यासाठी गेली असता परिसरातील काही लोकांनी तिला वाचविले. त्यानंतर मौदा पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मनाबाई ची सर्व हकीकत जाणून घेऊन घरी जाण्याचा सल्ला दिला. परंतू मनाबाईनी घरी जाण्यास स्पष्ट नकार दिल्या नंतर मौदा पोलीस स्टेशन च्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: निराधार असलेल्या रत्नाबाई ठाकूर यांना मुलबाळ नसल्याने मागील 10-15 वर्षांपासून शाळेसमोर गोळ्या बिस्कीट विकण्याचे काम करून स्वतःचा व पतीचा उदरनिर्वाह त्या करायच्या. उतरत्या वयात आता काम जमेनासे झाले. किरायाने राहत असल्याने घरभाडे देणे सुद्धा शक्य नव्हते. त्यामुळे पारडी पोलिसांच्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: खापरखेडा टी पॉईंट, आशा हॉस्पिटल समोर कामठी येथे सदर व्यक्ती पावसात भिजत पडले होते. पायाला खर्चटले होते. अशातच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे उपचारासाठी दाखल केले. सदर व्यक्तीचे कुणीही नातेवाईक नसल्याने जुनी कामठी पोलीस स्टेशन यांच्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: अमरावती वरून मुंबई ला तरुण वयात कामासाठी गेलेला सुरेश काम न मिळाल्याने मानसिक झाला. मानसिक अवस्थेत जुने रेल्वे स्टेशन दिल्ली येथे पोहचला. त्यानंतर अपना घर आश्रम पुठखुर्द दिल्ली येथे त्याला ठेवण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी श्रद्धा रिह्याबिलीटेशन फाऊंडेशन कर्जत रायगड येथे आणून 3 महिने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारा नंतर अमरावती चा पत्ता सांगू लागले. पत्ता ठिकाणी पोहचल्या नंतर परिवारातील कुणीही हयात नसल्याने पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: मुलगा घरी ठेवायला तयार नसल्यामुळे बेघर झालेल्या उषा कुचनवार यांना हुडकेश्वर पोलीस स्टेशन च्या विनंती पत्रावरून आश्रम मध्ये दाखल करण्यात आले. त्या क्षणी उषाबाई चा उजवा पाय गंभीर जखमी होता.
हकीकत: अंजनीबाई मध्यप्रदेश येथील रहिवासी असुन रोजगारासाठी एकुलत्या एक मुलासोबत बुटीबोरी MIDC स्थित टेंभरी येथे राहायला आली. काही दिवसांनी अजनी बाईला सून कौटुंबिक कारणातून मारझोड करायला लागली. मुलगा सुद्धा सुनेचा भाग घेऊन त्रास देऊ लागला. अंजनी बाई या सर्व गोष्टीला कंटाळून MIDC पोलीस स्टेशन येथे जाऊन सर्व हकीकत पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस स्टेशन MIDC बुटीबोरी यांच्या विनंती पत्रावरून पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: मौदा जवळील भामेवाडा या गावात भीक मागुन स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या मुखबधिर वयोवृद्द महिला ज्यांचे नाव, गाव काहीही माहिती नाही. अशा आजीला ग्रामवासियांच्या विनंती वरून आश्रम मध्ये दाखल केले. आजीचे नाव माहिती नसल्याने तिचे नाव सुद्धा आश्रम मध्ये अपर्णाबाई ठेवण्यात आले.
हकीकत: मानबाई ही निराधार असुन तिला स्वतःचे घर नाही. पोलीस स्टेशन पारडी यांच्या विनंती पत्रावरून मानबाई ला आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.
हकीकत: प्रभा ही मानसिक असल्यामुळे तिचे लग्न झाले नाही. काही दिवस भावांन कडे राहली. त्यानंतर ती घरून निघून आली. ती बेघर असल्याचे निष्पन्न होताच तिला पुनर्जन्म आश्रम मध्ये दाखल करण्यात आले.